Pune : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, PMPML च्या ५० बसेसच्या मार्गात बदल

Pune : गुरूवारी संपूर्ण पुण्यामध्ये पाणीकपात होणार आहे. त्यामुळे पुणेकर चिंतेत आहेत. त्यातच आता आणखी एक महत्त्वाची बातमी पुणेकरांसाठी समोर आली आहे. बुधवारी पुण्यात २० बसेसच्या मार्गात बदल करण्यात आलाय. त्यामुळे उद्या घराबाहेर पडण्याआधी बसचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा. अन्यथा नाहक त्रासाचा सामना करावा लागू शकतो. पुणे महानगर पालिकेच्या वतीने बुधवारी पादचारी दिनाचे आयोजन करण्यात आले, त्यामुळे ५० बसेसच्या मार्गात बदल करण्यात आलाय.

पुण्यामध्ये बुधवारी पीएमपीच्या ५० बसेसच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्यावतीने उद्या पादचारी दिनाचे आयोजन केले आहे. त्या दिनानिमित्ताने लक्ष्मी रस्त्यावर 'वॉकिंग प्लाझा' हा उपक्रम पार पडणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान लक्ष्मी रस्त्यावरून धावणाऱ्या 'पीएमपी' बसच्या मार्गात बदल केला जाणार आहे. यामुळे ५० बसच्या मार्गात बदल होणार आहे. कोण कोणत्या मार्गात बदल केला जाणार, वाचा

Mumbai Best Bus Accident : मुंबईत भरधाव बेस्ट बसने अनेकांना उडवलं; अपघातात ३ जणांचा मृत्यू

५५, ५८ व ५९ शनिपार चौकहून अ. ब. चौक, नारायण पेठ, अलका टॉकीज चौकातून आपल्या निर्धारित मार्गाने.
मार्ग क्रमांक ५७ या मार्गावरील बसेस पुणे स्टेशनकडून नारायण पेठमार्गे अलका टॉकीज चौक,आपल्या निर्धारित मार्गाने.

मार्ग क्रमांक.१७४ पुणे स्टेशनकडून एनडीएकडे जाताना सिटी पोस्टपर्यंत नियमित मार्गाने व पुढे उजवीकडे वळून अ. ब. चौक, नारायणपेठ, अलका टॉकीज चौकहून आपल्या निर्धारित मार्गाने. १९७ व २०२ या मार्गावरील बसेस हडपसर येथून कोथरूड डेपो, वारजे माळवाडीकडे जाताना सिटी पोस्टपर्यंत नियमित मार्गाने धावेल. अ. ब. चौक, नारायण पेठमार्गे अलका टॉकीज चौक, आपल्या निर्धारित मार्गाने धावेल.

मार्ग क्रमांक ६८ या मार्गावरील बसेस अप्पर डेपोकडे जाताना नियमित मार्गाने व अप्पर डेपोकडून सुतारदराकडे येताना टिळक रस्त्याने धावेल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply