Pune Crime : पुणे हादरलं! बुधवारपेठेत भररस्त्यात तरुणाची गळा चिरुन हत्या; पोलीस तपासात धक्कादायक कारण आलं समोर...

Pune Crime : मागील काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. किरकोळ कारणावरून खूनासारख्या गंभीर घटना घडत आहेत. आरोपींना कायद्याचा धाक राहिलाच नाही, अशीच परिस्थिती निर्माण झालीये. शुक्रवारी (९ फेब्रुवारी) पुण्यातील बुधवारपेठेतील क्रांती चौकात एका तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.

याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली. नईम शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कलाम उर्फ रूबेल शेख याला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पश्चिम बंगालमधील महिला राहायला आहे.

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात; एअरबॅग उघडून फाटल्या, तिघांचा जागीच मृत्यू

आरोपी कलाम शेख तिचा पती असून सहा महिन्यांपूर्वी महिलेने नईम शेख याच्याशी विवाह केला होता. त्यानंतर दोघेजण एकत्र राहत होते. पत्नीने दुसरा विवाह केल्याने आरोपी कलाम चिडला होता. तो पत्नीसह नईमवर पाळत ठेवून होता.

शुक्रवारी (९ फेब्रुवारी) सायंकाळी बुधवार पेठेतील क्रांती चौकात सागर बिल्डींगजवळ कलाम थांबला होता. काही वेळानंतर आरोपी नईम तेथे आला. त्याने खिशातून वस्तरा काढला आणि नईमच्या गळ्यावर सपासप वार केले. आरडाओरड झाल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, स्थानिकांनी गंभीर जखमी झालेल्या नईमला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत पश्चिम बंगालला पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी कलामला पुणे रेल्वेस्थानकावरून अटक केली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply