Pune : बुधवार पेठेत पोलिसांचा पुन्हा छापा; 11 बांग्लादेशी ताब्यात, सहा जणांची कबुली—नेमकं काय घडलं?

Pune : बुधवार पेठ परिसरातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत संशयित 22 महिलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी 11 महिला बांगलादेशी नागरिक असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

भारतीय नागरिक असल्याचे ओळखपत्र
खडक आणि फरासखाना पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. संबंधित वेश्यागृहावर अचानक छापा टाकून महिलांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या 22 महिलांपैकी 11 महिलांनी भारतीय नागरिक असल्याचे ओळखपत्र सादर केले. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्याची पडताळणी करण्यात आली आहे. उर्वरित 11 महिलांपैकी 6 महिलांनी चौकशीत आपण बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. उर्वरित 5 महिलांची कागदपत्रे तपासल्यानंतर त्या देखील बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी संबंधित वेश्यागृह सील करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मानव तस्करी आणि बेकायदेशीर वेश्याव्यवसायाविरोधात अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास सुरू असून संबंधित महिलांची नागरिकत्व स्थिती, त्यांना येथे आणणारी टोळी, दलालांची भूमिका आणि आर्थिक व्यवहार याबाबत अधिक तपास केला जात आहे. तसेच परदेशी नागरिकांच्या बेकायदा वास्तव्यासंबंधी संबंधित विभागांनाही माहिती देण्यात येणार आहे.

कोंम्बिंग ऑपरेशन निष्फळ?
पुणे पोलिसांनी नुकतेच बुधवार पेठेत ‘कोम्बिंग ऑपरेशन’ केले होते. त्यावेळी बुधवार पेठ परिसरातील सर्व रस्ते बंद करून पोलिसांनी प्रत्येक इमारतीत झडती घेतली होती. त्यावेळी पोलिसांनी काही अल्पवयीन मुली ताब्यात घेतल्या होत्या. तर एक बांगलादेशी महिलेला अटक केली होती. मात्र, त्यानंतर पाच ते सहा दिवसांतच मोठ्या संख्येने बांगलादेशी महिला सापडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी गेल्या आठवड्यात 39 कुंटणखाने, 700 व्यक्तींच्या घेतलेल्या झडतीत, पोलिसांच्या हाती काही लागले नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संपूर्ण इमारत सील
बांगलादेशी महिला सापडलेल्या कुंटणखान्याच्या इमारतीत अनेक कुंटणखाने चालविले जातात. ही संपूर्ण इमारत सील करण्याबाबत कार्यवाही केली जात आहे, अशी माहिती अमितेशकुमार यांनी दिली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *