Pune Bogas Voting : माझ्या नावावर कुणीतरी बोगस मतदान केलं; पुण्यातील तरुणी भडकली

Pune Bogas Voting : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात मतदान होत आहे. मतदानावेळी अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. तर काही ठिकाणी बोगस मतदानाच्या घटना देखील घडल्या आहेत. पुण्यात सर्वाधिक बोगस मतदान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मतदान केंद्रावर मतदानासाठी गेलेल्या नागरिकांच्या नावावर आधीच कुणीतरी मतदान केल्याचं समोर आलं आहे.

यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. कोथरुड परिसरात असलेल्या मतदान केंद्रावर एक तरुणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेली होती. ही तरुणी पहिल्यांदाच लोकशाहीचा हक्क बजावणार होती. मात्र, तिच्या नावावर आधीच दुसऱ्या व्यक्तीने मतदान केलं होतं. त्यामुळे तरुणीला मतदानापासून वंचित राहावं लागलं.

Pune Voting : पुण्यात बोगस मतदानाचा प्रकार उघड, काँग्रेस शहराध्यक्षाच्या नावाने दुसऱ्यानेच केलं मतदान

हा प्रकार समोर येताच तरुणी चांगलीच संतापली. आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती तिने व्हिडीओच्या माध्यमातून दिली. गौतमी पाटील असं या तरुणीचं नाव आहे. ती कोथरूड परिसरातील रहिवासी आहे. सोमवारी सकाळी गौतमी थोरात उद्यान येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेली होती.

मतदान केंद्रावर पोहचल्यावर मतदान कर्मचाऱ्यांनी तिला मतदान करण्यापासून रोखलं. गौतमीने जाब विचारला असता, तुझ्या नावावर आधीच मतदान झालं आहे, असं कर्मचाऱ्यांनी तिला सांगितलं. यामुळे गौतमीला चांगलाच धक्का बसला. आपल्याला कुणीही सहकार्य केलं नसल्याचा आरोप गौतमीने केला आहे.

दरम्यान, मतदान कर्मचाऱ्यांनी मला १७ नंबरचा फॉर्म भरून दुसरे मतदान करा, असं सांगितलं आहे. पण आता मी दुसरं मतदान करणार नाही, असंही गौतमीने सांगितलं आहे. आपल्या नावावर कुणीतरी दुसराच व्यक्ती मतदान करतो हे लोकशाहीसाठी घातक आहे, असंही गौतमीने म्हटलं आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply