Pune Bangalore National Highway Traffic Update : पडळकरांसह हजाराे धनगरांनी राेखला पुणे-बंगळूर महामार्ग, वाहतूक ठप्प

Pune Bangalore National Highway Traffic Update : धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज (शुक्रवार) धनगर समाजाच्या वतीने पुणे-बंगळूर महामार्गावर  खंडाळा गावानजीक रास्ता राेकाे आंदाेलनास  प्रारंभ केला आहे. या आंदाेलनात गोपीचंद पडळकर  हे देखील सहभागी झाले आहेत. या आंदाेलनामुळे पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत  झाली आहे.

धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या 13 दिवसांपासून लाेणंद येथे  आंदाेलन सुरु हाेते. या आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज आंदाेलकांनी पुणे बंगळूर महामार्गाची वाट धरली

Siddaramaiah : शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार दोन हजार रुपये; राज्य सरकारकडून पीक नुकसानभरपाईची घोषणा

या आंदाेलकांनी खंडाळा गावाजवळ रास्ता रोको केला. या आंदाेलनात हजारो धनगर बांधव रस्त्यावर बसल्याने खंबाटकी घाटातील  वाहतुक खाेळंबली. या आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे-बंगळूर महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply