Accident News : देवदर्शन करून तुळजापूरहून पुण्याकडे जाणारी बस उलटली; तीस जखमी

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील मळद येथे शनिवारी ( ता. ८ ) सकाळी सहाच्या सुमारास पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर देवदर्शन करून तुळजापूरहून पुण्याकडे भरधाव वेगात जाणारी खाजगी आराम बस खड्डयात उलटल्याने प्राथमिक माहितीनुसार पुणे शहरातील एक महिला भाविक ठार झाली असून दोन ते तीन अत्यावस्थ असन तीसपेक्षा जास्त भाविक जखमी झाले आहेत. त्यामध्ये वृध्द महिला पुरूष व लहान मुलांचा समावेश आहे.

पुणे शहरातील भवानीपेठ, लोहियानगर परिसरातील ५५ ते ६० भाविक खाजगी आराम बसमधून ( एमएच.१२, एफसी. ९०५५ ) तुळजापूर व यरमाळा येथील देवीच्या दर्शनाला गेले होते. देवदर्शन करून पुण्याकडे परत असताना दौंड तालुक्यातील मळद हद्दीतील घागरेवस्तीजवळ शनिवारी ( ता.८ ) सकाळी सहाच्या सुमारास चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस मुख्य रस्ता व सेवा रस्त्याच्यामधील पावसाचे पाणी जाण्यासाठी ठेवलेल्या मोरीमध्ये उलटली.

या अपघात बसमध्ये प्रवाशी अंगावर पडून खाली सापडल्याने एक महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचा व आणखी पंचवीस ते तीस भाविक जखमी झाले असून त्यापैकी दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचा प्राथमिक अंदाज मदतकार्य करणार्या स्थानिक तरूणांनी व्यक्त केला. जखमींना उपचारासाठी दौंड व भिगवण ( ता. इंदापूर ) येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तर किरकोळ जखमी झाले महिला, पुरूष, तरूण व लहान मुले अपघातस्थळी घाबरलेल्या अवस्थेत इतर नातेवाईकांची चौकशी करीत होते. तर काही जण सेवारस्त्यावर सून्न होऊन बसले होते. भाविकांकडे चौकशी केली असता हे सर्वजण पुणे शहरातील भवानीपेठ लोहियानगर व विमाननगर परिसरातील असल्याचे सांगितले. हे सर्व भाविक चैञ पौर्णिमेला असलेल्या तुळजापूर व यरमाळा येथील देवीच्या दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून पुण्याकडे घरी परतत असताना हा दुदैवी अपघात झाला.

मळद परिसरातील अनेक तरूणांनी बसमध्ये अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. बसचालकाने मद्यपान केले होते अशी माहिती घटनास्थळी मदतकार्य करणार्यांनी सांगितले. अपघातानंतर काही प्रवाशी बसच्या खिडकी दरवाजातून मोरीत पडल्याने बचावले. त्यामध्ये एका लहान मुलाचा समावेश होता. अपघात होताच दादा मोरे, हरिदास घागरे, अभिजित दुधे आदी परिसरातील तरूणांनी प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्याचे मदत कार्य केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply