Pune Accident : अपघातानंतर माझा पुतण्यानेच मदत केली, त्याने मद्यपान केलेलं नव्हतं; आमदार मोहिते यांचा दावा

Pune Accident :  अजित पवार गटाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने सुसाट कार चालवत दुचाकीस्वाला चिरडलं. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनं संताप व्यक्त केला जात आहे. अपघातावेळी कारचालकाने मद्यपान केलं होतं, असा दावाही काहींंनी केला आहे. मात्र, याचे आमदार मोहिते यांनी खंडण केलं आहे.

घडलेल्या घटनेवर दु:ख व्यक्त करत आमदार मोहिते यांनी साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली आहे. घडलेली घटना दुदैवी असून मृत तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेणार, असं आमदार दिलीप मोहिते यांनी म्हटलं आहे. अपघातानंतर माझा पुतण्या मयुर साहेबराव मोहिते हा कुठंही पळून गेला नाही. ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा त्याने मद्यपान केलेलं नव्हतं, असं मोहिते यांनी स्पष्ट केलं आहे.

Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्याने दोघांना कारखाली चिरडलं

"नाशिक-पुणे हायवेवर असलेल्या अंधारामुळे अपघात झाला. अपघातानंतर जखमीला रुग्णालयात पाठवल्याचं काम माझ्या पुतण्याने केलं. अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती, म्हणून कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून मयुर हा कारमध्ये बसून होता. सध्या या अपघाताची पोलीस चौकशी करत आहेत. मी त्यात अजिबात हस्तक्षेप करणार नाही", असंही मोहिते यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना दिलीप मोहिते म्हणाले, "माझा पुतण्याने कधी उभ्या आयुष्यात दारू प्यायली नाही. तो इंजिनिअर असून उद्योजक देखील आहे. अपघात कसा आणि कशामुळे झाला याचा तपास पोलीस करतील. त्यानंतर पोलीस जे ठरवतील, ते मला मान्य आहे. काय आणि सुव्यवस्थेचे सर्वांनीच पालन केले पाहिजे", असं आवाहन देखील आमदार मोहिते यांनी केलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply