Pune Accident : पुण्यातील मार्केट यार्ड भागात भीषण अपघात; भरधाव डंपरची दुचाकीला धडक, महिला जागीच ठार

Pune : पुण्यातील मार्केट यार्ड भागात असलेल्या गंगाधाम चौकात भीषण अपघात झाला आहे. गंगाधाम चौकात एका भरधाव ट्रकने महिलेला धडक दिली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरी एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या अपघातातील ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या चालकावर गुन्हा दाखल करण्याचं काम सध्या सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा अपघात दुपारी १ वाजेच्या सुमारास घडला आहे. आई माता मंदिर रोड येथे एका डंपरने दुचकीस पाठीमागुन धडक दिली.

Pune Crime : पिण्याचं पाणी मागितल्याने वाद; पुण्यात लोखंडी रॉडने वार करत तरुणाची हत्या

 

त्यामुळे या दुचाकीवर असलेलली एक महिला जागीच मृत्युमुखी पडली, तर दुसरी महिला गंभीर ज़ख़मी झालेली आहे. जखमी महिलेस उपचारकामी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. तर मृत्यू झालेल्या मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply