
Pune Accident News : पुण्यामध्ये बाईकला झालेल्या भीषण अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीये. भरधाव बाईकवरील ताबा सुटून ती विजेच्या लोखंडी खांबाला धडकली. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास खडकवासला परिसरातील कुडजे येथे हा अपघात झाला. अपघातामधील मृत तरुण आणि जखमी तरूण जळगावचे आहेत. जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यशोधन अविनाश देशमुख (२३ वर्षे) याचा अपघातामध्ये मृत्यू झाला. तर त्याचा मित्र हर्षल दिपक पाटील (२४ वर्षे) हा अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे. हे दोन्ही तरुण जळगावचे असून पुण्यातील बावधनमधील पेंबल्स अर्बनीया सोसायटीमध्ये राहतात. यशोधन आणि हर्षल हे खडकवासला परिसरात फिरायला गेले होते. यावेळी यशोधन सुसाट बाईक चालवत होता. त्याचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.
|
|
कुडजे गावाहून मुख्य रस्त्याने पुढे आगळंबे फाट्याकडे जाताना साहिल हॉटेलच्या जवळ यशोधनचा बाईकवरील ताबा सुटला. त्याची बाईक विजेच्या लोखंडी खांबाला जाऊन जोरात धडकली. या अपघातामध्ये यशोधनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर हर्षल गंभीर जखमी झाला. या अपघातामध्ये बाईकचे नुकसान झाले. त्याचसोबत विजेचा खांब वाकला, अशी माहिती उत्तमनगर पोलिसांनी दिली.
गंभीर जखमी झालेल्या हर्षल पाटीलवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यशोधनच्या मृतदेहावर ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. चाळीसगावमधील गावामध्ये त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उत्तमनगर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेमुळे यशोधनच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


