Pune Accident News : नवले पुलाखाली बस आणि ट्रकचा विचित्र अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली

Pune Accident News :  पुण्यामध्ये नवले पुलाखाली बस आणि ट्रकचा विचित्र अपघात झाल्याचं समोर आलं आहे. तीन वाहनं एकमेकांना आदळून हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील नवले पुलाखाली तीन वाहने एकमेकांना धडकली आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. आता घटनास्थळी पोलीस दाखल झाले  आहेत. घटनास्थळी पोलीस तपास सुरू आहे. 

Wheat News India : गहू खरेदी सातपट वाढविण्याचे उद्दिष्ट ; उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार या राज्यांमधून गहूखरेदीत वाढ

पुण्यात नवले पुलावर अपघात सत्र सुरूच आहे. आज सकाळच्या सुमारास ट्रक टँकर आणि खाजगी बसचा अपघात झाला होता. आता नवले पुलाखाली टँकर बस आणि ट्रकचा विचित्र अपघात झाला आहे. तीन वाहनं एकमेकांना धडकल्याने काही वेळ वाहतूक खोळंबली होती. वाहतुक पोलीस घटनास्थळी आल्यानंतर वाहन बाजूला करण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. अपघात कशामुळे झाला, हे समजू शकले नाही.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *