Pune Accident News : ट्रकने कारला दीड किलोमीटर नेले फरफटत; शिवशाही बससह पाच वाहनांना दिली धडक

Pune Accident News : पुण्यात मुंबई बेगळुरू महामार्गावर आज प्रवाशांना विचित्र अपघाताचा अनुभव आला. पुण्यातील भूमकर पुलावर साडेपाच शनिवारी पाच वाजण्याच्या सुमारास पाच वाहनांना ट्रकने धडक दिली. तर एका कारला तब्बल दीड किलो मीटर फरपटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात चार जण जखमी असून त्यांना जवळील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई बेगळुरू महामार्गावर पुण्यातील भूमकर पुलावर एका ट्रकने एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला धडक दिली. त्यांनतर एक पिकप, रेनॉल्ट कंपनीच्या एका कारला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यानंतर ट्रक चालकाने बाजूने जात असलेल्या एका कारला ट्रकच्या समोरील बाजू धडक दिली आणि या कारला जवळपास दीड किलोमीटर फरपटत नेले. यादरम्यान महामार्गावरची वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

4 State Assembly Election Result : PM नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ : अजित पवार

अपघात मोठी जीवितहानी टळली असली तरी चार जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी अपघातस्थळी दाखल होऊन पाहणी केली. तसेच या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply