Pune Accident : भोरमध्ये भीषण अपघात, २ दुचाकी समोरासमोर धडकल्या, २ जणांचा जागीच मृत्यू

Pune Accident : पुण्यातील मांढरदेवी मार्गावरील निळकंठ गावाच्या हद्दीत झालेल्या दुचाकी अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली, अपघात इतका भीषण होता, की एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याने उपचारादरम्यान प्राण सोडले. अपघाताबाबत वैभव गायकवाड यांनी तक्रार दाखल केली असून, अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मांढरदेवी मार्गावरील निळकंठ गावच्या हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे. चंद्रकांत लक्ष्मण जावळे (वय ६०,रा.नीरा ता. पुरंदर) व उत्तम गायकवाड (वय ४५, रा. नीलकंठ) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

याबाबत भोर पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, मयत चंद्रकांत जावळे आणि उत्तम गायकवाड हे दुचाकी (क्रमांक एम एच १२ टी जी ०९४६) वरून निळकंठ गावाकडे निघाले होते. त्यावेळी समोरून येत असलेली दुचाकी (क्रमांक एम एच १२ डब्ल्यू सी २७२०) यांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोघेही रस्त्यावर पडले. दोघांच्याही डोक्यांना जबर मार लागला होता. दुचाकींच्या धडकेनंतर चंद्रकांत जावळे यांचा जागीच मृत्यू झाला तर उत्तम गायकवाड यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच भोर पोलीस ठाण्याचे कर्मचारी काही मिनिटांमध्येच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दुसरा दुचाकीस्वार ही जखमी झाल्याने तोही उपचारासाठी निघून गेला. याबाबत वैभव आनंदा गायकवाड यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात दुचाकी स्वारावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply