Pune Accident : वाघोलीत अपघात सत्र सुरूच, सलग दुसऱ्या दिवशी डंपरने दुचाकीस्वाराला उडवलं

Pune Accident : पुण्यातील वाघोलीमध्ये रविवारी मध्यरात्री भरधाव डंपरने ९ जणांना चिरडल्याची घटना घडली होती. या अपघातामध्ये ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच वाघोलीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा डंपरने एका तरुणाला उडवलं. या अपघातामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी दुचाकीस्वारावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघोलीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी डंपरचा अपघात झाला आहे. डंपरने दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार ⁠साईराज देशमुख हा गंभीर जखमी झाला आहे. ⁠वाघोलीतील वाघेश्वर मंदिर या ठिकाणी हा अपघात झाला. ⁠रविवारी वाघोलीत केसनंद फाट्यावर एका डंपरने ९ जणांना चिरडले होते. या घटनेनंतर वाघोली परिसरामध्येच हा दुसरा अपघात झाला आहे. वाघोली पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे.

Ladki Bahin : लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा ! आता घरकूल योजनेतही लाभ मिळणार, तब्बल 'इतकी' घरं मंजूर

वाघोलीमध्ये डंपरने ९ जणांना चिरडल्याप्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. या डंपर चालकाला २७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. डंपर चालक गजानन तोटरे याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अपघात प्रकरणी गजानन तोटरे याच्यावर वाघोली पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपीने मद्यपान कुठे केले तसेच त्याच्याबरोबर कोण होतं? त्याच्याकडे वाहन परवाना आहे का? या दृष्टीने तपास करायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. पुणे सत्र न्यायालयाने टोटल याला २७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, अमरावतीवरून पुण्यामध्ये कामाच्या शोधासाठी आलेले काही जण वाघोलीमध्ये रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपले होते. यामधील ९ जणांना डंपरने चिरडले होते. यामध्ये ३ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला होता.**

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply