Pune Accident : पुण्यात मध्यरात्री थरार! भरधाव डंपरने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू

Pune Accident : पुण्यात काल रात्री भीषण अपघात झाला आहे. काल रात्री १२.३० च्या सुमारास पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघतात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्यातील या अपघाताने सगळीकडे खळबळ उडाली आहे.

पुण्यात डंपर चालकाने हा अपघात केला आहे. डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. या अपघातात ९ जणांना चिरडले आहे. यामध्ये दोन लहान मुले असल्याची माहिती मिळणारी आहे. तर सहाजण गंभीर जखमी झाले आहे. या जखमींधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

Sangli News : बेदाणा युनिटच्या नावाखाली बँकेची दोन कोटींची फसवणूक, ७ जणांवर गुन्हा दाखल

पुण्यातील वाघोलीतील केसनंद फाटा येथे ही घटना घडली आहे. रात्री १२.०० च्या सुमारास ही घडली असून ड्रायव्हर दारु पिऊन गाडी चालवत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

या अपघातात वैभवी रितेश पवार ( वय १ वर्ष ), वैभव रितेश पवार (वय २ वर्ष), रीनेश नितेश पवार (वय ३) यांचा मृ्त्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्यातील या अपघातात जखमी झालेले सर्वजण कामगार आहेत. रविवारी रात्री ते अमरावती येथून पुण्यात कामासाठी आले होते. या फुटपाथवर १२ जण झोपले होते.तर काहीजण फूटपाथच्या बाजूला असलेल्या झोपडीत झोपले होते. रात्री १२.३० च्या सुमारास डंपर येऊन सरळ फुटपाथवर चढून झोपलेल्या व्यक्तींच्या अंगावरुन गेला. यात तिघाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply