Pune Accident : पुण्यातील कात्रज परिसरात विचित्र अपघात, कारचालकाने ४ ते ५ दुचाकींना उडवलं;

Pune Accident : पुणे शहरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या कारने ३ ते ४ दुचाकींना जोरदार धडक दिली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. मात्र, दुचाकीस्वार जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघातात दुचाकींसह कारचं मोठं नुकसान झालं आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

कात्रज मांगडेवाडी, सुंदरनगर परिसरात बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. अपघातानंतर रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Kolhapur News : रस्त्यांच्या कामातील निकृष्टता खपवून घेणार नाही : हसन मुश्रीफ, काेल्हापूरात 100 कोटींच्या कामांना प्रारंभ

पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतलं असून अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वारांना रुग्णालयात दाखल केलं आहे. गाडीचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply