Pune Accident : पुणे-सोलापूर हायवेवर एसटीचा भीषण अपघात; ४० जण थोडक्यात बचावले!

पुणे सोलापूर महामार्गावर एसटी बस, कार आणि ट्रकचा भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील ४० प्रवाशांचे प्राण वाचले. ही घटना कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊरफाटा येथे संध्याकाळी ५ वाजता घडली. पी.डी सावंत असे प्रवशांचे जीव वाचवणाऱ्या एसटी बस चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोट - ठाणे या (एमएच १४ बीटी २६९३) ही गाडी पुणे सोलापूर महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जात होती. बस थेऊर फाट्याजवळ आली असता बसचा अचानक ब्रेक फेल झाला. बसने समोर असलेल्या कार आणि ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात कार आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या अपघातात रस्त्याच्या दुभाजकाला रंग देणारा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.

पी. डी सावंत हे एसटी बस चालवत होते. अचानक फेल झालेल्या ब्रेक मुळे त्यांचे गाडी वरचे नियंत्रण सुटले. बस समोर असलेल्या गाड्यांना धडक बसली मात्र सावंत यांनी प्रसंगवधान दाखवून पुन्हा बसवर नियंत्रण मिळवून बस रस्त्याच्या एका बाजूला घेऊन थांबविली. यामुळे बसमधील ४० जणांचे प्राण वाचले



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply