Pune : पुण्यात खाकीच असुरक्षित, वाहतूक पोलिसाला नाका-तोंडातून रक्त येईपर्यंत मारलं

Pune traffic police assaulted by drunk men in Kondhwa : पुण्यामध्ये कायद्याचे रक्षकच सुरक्षित नाहीत का? असा सवाल विचारला जातोय. त्याला कारणही तसेच आहे. कोंढव्यात ५ जणांच्या टोळक्याने वाहतूक कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. पवन डिंबळे असे वाहतूक कर्मचाऱ्याचे नाव आहे. ड्युटी संपवून घरी जात असताना डिंबळेंना मारहाण झाली. मारहाणीत डिंबळे यांच्या कानातून आणि नाकातून रक्त आले. डिंबळे सध्या भारती विद्यापीठ विभागाच्या वाहतूक विभागात कार्यरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पुणे शहरातील कोंढवा परिसरात घडला. प्राथमिक माहितीनुसार, डिंबळे हे त्यांची ड्युटी संपवून घरी निघाले असताना कोंढवा भागातील एका ठिकाणी लघुशंकेसाठी थांबले. तिथे काही जणं दारू पित असल्याचं निदर्शनास आल्यानंतर डिंबळे यांनी त्यांना हटकलं. यातून त्या तरुणांमध्ये आणि पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाले. काही वेळात तिथे सबंधित तरुणांचे मित्र आले आणि त्यांनी पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करायला सुरुवात केली

पोलिस कर्मचाऱ्याने अंगात जॅकेट घातल्यामुळे संबंधित व्यक्ती कोण आहे हे त्या तरुणांना कळले नाही. जखमी पोलिस कर्मचाऱ्याला तात्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास कऱण्यात येत आहे. हल्लेखोराच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. सीसीटीव्ही तपासले जात आहेत पुण्यात पोलीसच सुरक्षित नाहीत का? असा सवाल विचारला जातोय.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *