Pooja Khedkar : खेडकर कुटुंबाचा पाय आणखी खोलात, पूजा खेडकरच्या आई-वडिलांचा घटस्फोट झालाच नाही, आरक्षणासाठी कट?

Pune : वादग्रस्त आयएएस अधिकारी पुजा खेडकरने आयएएस होण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून ओबीसी नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट सादर केले होते. त्यामध्ये तिने आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचं सांगितलं होतं. आता ओबीसी नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेटसाठी पूजा खेडकरने आई-वडील विभक्त झाल्याचं खोटं प्रमाणपत्र दिलं होतं का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पुणे पोलिसांना याचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा खरंच घटस्फोट झाला होता का, याचा तपास आता केला जाणार आहे. त्यामुळे खेडकर कुटुंबीयांच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार आहे.

दिलीप खेडकराच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात पती-पत्नीची एकत्र संपत्ती


पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून दिलीप खेडकर यांच्या संपत्तीचा तपास केला जात आहे. त्यामध्ये नगर दक्षणिची निवडणूक लढवताना दिलीप खेडकर यांनी निवडणूक प्रतिद्यापत्रात पती-पत्नी म्हणजेच दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांची एकत्र मिळून अशी संपत्ती दाखवली होती. त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला होता की नाही, हा प्रश्न आहे. सध्या पोलीस याप्रकरणी तपास करत असून यामुळे खेडकर कुटुंबाचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray : दिल्लीचे बूट चाटणाऱ्या घटनाबाह्य सरकारला किंमत मोजावी लागणार, ठाकरेंची तोफ

घटस्फोटाचा कट रचल्याची शक्यता


पोलिसांची गुन्हे शाखा दिलीप यांच्या संपत्तीचा तपास करत आहेत. त्याआधारे त्यांना ताब्यातही घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचा २०१० साली घटस्फोट झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. मात्र, हा घटस्फोट फक्त दिखाव्यासाठी असल्याचे पुरावे देखील आता समोर आले आहेत. त्यामुळे दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांनी मुलगी पुजा खेडकरला ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी घटस्फोटाचा बनाव रचल्याच दिसून येत आहे.

दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचा घटस्फोट २००९ साली झाला, दोघांच्या सहमतीने हा घटस्फोट झाल्याची माहिती आहे. मनोरमा खेडकर यांनी दोन मुलांची कास्टडी मागितली होती. मात्र, प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागितलेला नव्हता. घटस्फोट झाल्यानंतर दोघे वेगळे राहणं अपेक्षित होत. परंतु, खेडकर कुटुंब पुण्यातल्या बाणेर रोडवरील नॅशनल सोसायटीमध्ये एकत्रच राहत होतं. सोबत त्यांनी एकत्र घालवलेल्या क्षणांचे फोटो, व्हिडिओही समाज माध्यमांवर उपस्थित आहेत. या गोष्टीवरून शंका आणखी बळावली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबतचा तपास करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply