Pune Corona Virus: धोक्याची घंटा! मुंबईपाठोपाठ पुण्यात आढळला कोरोना रुग्ण; पुणेकरांची चिंता वाढली

Pune : राज्यात कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातही कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. पुण्यातील एका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ८७ वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलंय. या वर्षाती पुण्यात आढळून आलेला हा पहिलाच कोरोना रुग्ण आहे. पुण्यात पुन्हा कोरोनाने शिरकाव केल्यामुळे पुणेकर चिंतेत आले आहेत.

पुण्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आले आहे. आरोग्य विभागाकडून कर्मचाऱ्यांना आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र कोणी घाबरून जाऊ नये असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलंय. गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण -पूर्व आशियातील देशांमधे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. मात्र कोरोनाचा हा व्हायरस घातक नसल्याचे आरोग्य विभागातील तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय.

Malegaon Urdu School : उर्दु शाळांना बनावट जीआरने मान्यता; मालेगावात ६ शाळांच्या ७४ बनावट तुकड्या

मुंबईमध्ये कोरोनाने धोक्याची घंटा दिली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत मुंबईत ५६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. या सर्व रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यानंतर मुंबईत देखील पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. पालिकेकडून उपाययोजना करण्यास सुरूवात झाली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचे ५३ सक्रिय रुग्ण आढळले आहेत. मुंबईत ८ कोरोना रुग्ण काल राज्यात एका ही रुग्णाची नोंद नाही झाली. कोरोनामुळे अद्याप एकही मृत्यूची नोंद झाली नाही. राज्यातील रुग्ण होण्याचे प्रमाण ९८.१८ टक्क्यांवर आहे. राज्यातील सर्व रुग्ण मुंबई महापालिकेच्या आखत्यारीत असून इतर कुठल्या ही जिल्ह्यात नव्याने रुग्णाची नोंद झाली नाही.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply