Pune  : खडकवासला धरण साखळी ६१ टक्के भरली, १७.८२ टीएमसी इतका पाणीसाठा जमा

Pune  : पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरण क्षेत्रात मागील आठ दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणसाठ्यात पाणी झपाट्याने वाढ होत आहे. या चारही धरणात सकाळ ६ वाजेपर्यंत ६१ टक्के पाणी भरले, तर १७.८२ टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे. 

तसेच धरणक्षेत्रात पावसाचा जोर लक्षात घेऊन खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये ९ हजार ४१६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या भागात राहणार्‍या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन खडकवासला पाठबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे.

Pune : पुणेकरांसाठी गुड न्यूज : खडकवासला धरण १०० टक्के भरले

धरण आजचा पाऊस टीएमसी टक्के
खडकवासला २८ १.९१ ९६.८७
पानशेत ८२ ७.२५ ६८.१२
वरसगाव ८२ ६.८५ ५३.४०
टेमघर १७० १.८० ४८.६२


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply