Gaja Marne : गजा मारणेला जेलमध्ये नेताना मटण पार्टी, ढाब्यावर 'ते' ३ लोकंही उपस्थित

Pune : पुण्यातील कुख्ख्यात गँगस्टर गजा मारणे गुन्हेगारी क्षेत्रात दहशत निर्माण करण्याचा त्याचा कायम प्रयत्न असतो. मात्र, पोलिसांनी अटक केल्यावर येरवडा कारागृहात स्थानिक गुंड, आरोपींसोबत राहणे त्याला कमीपणाचे वाटते. त्यामुळे त्याला येरवडा कारागृह नकोसं वाटत होतं. ही गोष्ट पोलीस आयुक्तांना समजल्यावर त्याला सांगली कारागृहातून पुन्हा येरवडा कारागृहात आणण्यात आलं, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) कारवाई करण्यात आलेला कुख्यात गजानन ऊर्फ गजा मारणेला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात घेऊन जाताना पोलिसांसमक्ष एका ढाब्यावर मारणे आणि त्याच्या साथीदारांची ‘मटण पार्टी’ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी घेतली असून, त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या एक सहायक निरीक्षकासह चार पोलीस अंमलदारांचं निलंबन करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.

Pune Crime : पत्रकार असल्याची बतावणी करत सलून मालकांना ब्लॅकमेल, पुण्यातील मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पिता-पुत्राचा कांड

कोथरूडमधील एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी मारणेसह अन्य काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मारणे टोळीवर मकोका लावण्यात आला आहे. ते सर्व आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहेत. मात्र, पुणे पोलिसांनी एक महिन्यापूर्वी मारणे याला सांगली कारागृहात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गुन्हे शाखेचे एक पथक त्याला बंदोबस्तात सांगलीला घेऊन चालले होते. त्या वेळी हा धक्कादायक प्रकार घडला.

पोलिसांची वाहने पुण्यातून बाहेर पडताच त्यांच्या दोन फॉर्च्युनर, एक थार आणि अन्य एका गाडीने पाठलाग सुरू केला. पोलीस साताऱ्यात आल्यानंतर महामार्गावरील एका प्रसिद्ध ढाब्यावर थांबले. धाब्यावर कर्मचाऱ्यांनी जेवण केलं. त्यावेळी पोलिसांच्या पाठीमागून चार वाहनांतून आलेल्या व्यक्तीही तेथे दाखल झाल्या. त्या व्यक्ती मारणेचे समर्थक, कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट झालं. त्यामध्ये पोलिस रेकॉर्डवरील काही सराईत गुन्हेगारांचाही समावेश होता.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply