
Pune : झिपलाईन हा साहसी खेळ खेळताना पुण्याच्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. झिपलायनिंग करताना ३० फूट उंचीवरून पडून तरुणीचा जागीच मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील राजगड वॉटरपार्कमध्ये ही धक्कादायक घटना घडली. तरल अटपाळकर असं मृत्यू झालेल्या २८ वर्षीय तरुणीचं नाव आहे. मृत तरुणी आपल्या कुटुंबीयांसोबत वॉटर पार्कवर सुट्टी इन्जॉय करण्यासाठी गेली होती. कुटुंबीयांसमोरच या तरुणीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, तरल अटपाळकर ही तरुणी पुण्यातील नऱ्हे परिसरामध्ये राहत होती. शुक्रवारी तरल आपल्या कुटुंबीयांसोबत पुण्यानजीकच्या भोरमधील राजगड वॉटरपार्कमध्ये सुट्टी इन्जॉय करण्यासाठी गेली होती. सर्वांनी दिवसभर वॉटरपार्कमध्ये राईडचा आनंद घेतला. त्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तरल झिपलिंग करण्यासाठी गेली. तरल झिपलाईन करण्यासाठी ३० फूट उंचीवर गेली.
|
RTE Admission : शिक्षण हक्क कायद्याचा गैरवापर; रायगड जिल्ह्यात पालकांनी जोडले बोगस पुरावे |
रोपवर चालत असताना तिने सुरक्षा दोर वरच्या बाजूला रेलिंग करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी रेलिंगपर्यंत हात जात नसल्यामुळे तरलने जवळच्या लोखंडी स्टूलवर उभी राहून दोर लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्टूल हलला आणि बाजूला असलेल्या रेलिंगवरून तिचा पाय सटकला. त्यानंतर तरल थेट ३० फूट उंचीवरून खाली पडली. जमिनीवर डोकं जोरात आपटल्यामुळे तरल गंभीर जखमी झाली.
वॉटरपार्कमधील कर्मचारी आणि तरलच्या कुटुंबीयांनी तिला तात्काळ रुग्णालयात हलवले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. गंभीर जखमी झालेल्या तरलचा मृत्यू झाला. याप्रकरणी आता वॉटरपार्क चालक आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. सोबतच वॉटरपार्कचा निष्काळजीपणादेखील समोर आला आहे. याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


