Pune : टँकरच्या फेऱ्यांत वाढ, मार्च महिन्यात ४७ हजार ८९६ फेऱ्या

Pune  : शहरात वाढत्या उन्हाबरोबरच पाण्याची मागणी वाढली असून, टँकरच्या फेऱ्यांत वाढ झाली आहे. मार्च महिन्यात शहरात टँकरच्या ४७ हजार ८९६ फेऱ्या झाला आहेत. ही संख्या फेब्रुवारीमध्ये ३८ हजार ५२२ होती. एप्रिल आणि मे महिन्यात पालिका प्रशासनास शहराला पुरेसे पाणी देण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

मार्च महिन्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. काही दिवस तापमान ४० अंशांजवळ होते. वाढत्या उन्हाबरोबरच या महिन्यात जलवाहिन्या फुटणे, वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले. यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. परिणामी पाणी नसलेल्या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. शहरात जानेवारी २०२५ पासून प्रत्येक महिन्यात टँकरच्या मागणीत सरासरी ३ ते ४ हजारांची वाढ होत आहे. मात्र, मार्च महिन्यात ही संख्या १० हजारांनी वाढली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये शहरात सुमारे ३६ हजार ५९१ टँकरच्या फेऱ्या झाल्या होत्या. हा आकडा जानेवारी २०२५ मध्ये ३९ हजार ६९२ पर्यंत गेला होता.

Pune : पुणे विमानतळावरून प्रवाशांंची कोटींची ‘उड्डाणे’, एक कोटी प्रवाशांचा टप्पा पार



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply