Pune : महापालिकेच्या उत्पन्नात वाढ; आतापर्यंतचे सर्वाधिक; गेल्या वर्षीपेक्षा १२ कोटींनी अधिक

Pune  : पुणे महापालिकेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात ८ हजार २७२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्यात यश आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १२ कोटी रुपयांनी उत्पन्न वाढले असून, आतापर्यंतच्या महापालिकेच्या इतिहासामध्ये मिळालेले हे सर्वाधिक उत्पन्न असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे.

महापालिका आयुक्तांनी २०२४-२५ वर्षासाठी महापालिकेचे ११ हजार ६०१ कोटींचे अंदाजपत्रक तयार केले होते. त्यापैकी ३१ मार्च अखेरपर्यंत ८ हजार २७२ कोटी रुपयांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला. यामध्ये बांधकाम विभागाला बांधकाम परवानगीतून २ हजार ६०१ कोटी, मिळकतकरातून २ हजार ३६५ कोटी, जीएसटीमधून २ हजार ५०० कोटी, मीटरने पाणीपट्टीमधून ११६ कोटी, मुद्रांक शुल्कातून १९० कोटी, तर शासकीय अनुदान आणि इतर मधून ५०० कोटी असे ८ हजार २७२ कोटींचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी २०२३-२४ या आर्थिक वर्षात पुणे महापालिकेला ८ हजार २६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा यामध्ये १२ कोटी रुपयांची वाढ झाली.

बांधकाम विभाग सलग दुसऱ्या वर्षी सरस

महापालिकेचा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत म्हणून मिळकतकर विभाग आणि बांधकाम विभागाकडे पाहिले जाते. महापालिकेच्या बांधकाम विभागाला २०२४-२५ या आर्थिक वर्षात बांधकाम परवानगीतून सुमारे २ हजार ६०१ कोटींचे उत्पन्न मिळविण्यात यश आले आहे. तर, मिळकतकर विभागाला सुमारे २ हजार ३६५ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे मिळकतकर विभागापेक्षा अधिक उत्पन्न मिळविण्यामध्ये बांधकाम विभागाने सलग दुसऱ्या वर्षी बाजी मारली आहे.

वर्ष महापालिकेचे अंदाजपत्रक प्रत्यक्षात मिळालेले उत्पन्न

२०२०-२१ ६ हजार २३९ कोटी ४ हजार ७१३ कोटी

२०२१-२२ ७ हजार ६५० कोटी ६ हजार ८०६ कोटी

२०२२-२३ ८ हजार ५९२ कोटी ७ हजार १०० कोटी

२०२३-२४ ९ हजार ५१५ कोटी ८ हजार २६० कोटी

२०२४-२५ ११ हजार ६०१ कोटी ८ हजार २७२ कोटी



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply