Pune : विद्यापीठाच्या आवारात अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला कोठडी

Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थिनींसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी रविवारपर्यंत (३० मार्च) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.अनिश वसंत गायकवाड (वय २४, रा. कवडेनगर, पिंपळे गुरव) असे पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी गायकवाड याने मंगळवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थिनींसमोर अश्लील कृत्य केल्याची घटना घडली होती. विद्यापीठ प्रशासनाकडून चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. पोलिसांनी विद्यापीठाच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून पसार झालेला आरोपी गायकवाड याचा माग काढला. त्याला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली.

Baramati News : शिव'तारे बारामती पर...' ! शिवसेनेच्या आमदाराचा हटके सल्ला, शिंदेसेनेला हवाय अजितदादांचा बालेकिल्ला

आरोपी गायकवाड याला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. त्याने अशा प्रकारचे अश्लील कृत्य यापूर्वी केल्याचा संशय आहे, तसेच त्याच्याबरोबर अन्य कोण साथीदार आहेत का? त्यादृष्टीने तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी युक्तिवादात केली. न्यायालयाने गायकवाडला रविवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply