Pune : वेगवेगळ्या अपघातात पादचारी ज्येष्ठ महिलेसह दोघांचा मृत्यू

Pune  : शहरात वेगवेगळ्या अपघातात पादचारी ज्येष्ठ महिलेसह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हडपसर-सासवड रस्ता, तसेच कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर अपघाताच्या घटना घडल्या.

हडपसर-सासवड रस्त्यावरील उरळी देवाची परिसरात भरघाव वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सिंधूबाई श्रीपती क्षीरसागर (वय ८५, रा.उरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वाहनचालक मनोज अहिरे (वय २२, रा. निमोन, ता. चांदवड, जि. नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संतोष श्रीपती क्षीरसागर (वय ५५, रा. उरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष क्षीरसागर यांची आई सिंधूबाई या शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हडपसर-सासवड रस्त्याने निघाल्या होत्या. उरळी देवाच्या परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी क्षीरसागर यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला असून, पोलीस उपनिरीिक्षक महेश नलावडे तपास करत आहेत.

Pune : जिल्हा नियोजन समितीसाठी महायुतीची होणार कसरत ? हे आहे कारण

कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मझेर जिलानी शेख (वय ३४, रा. कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मझेर यांचा भाऊ अजरुद्दीन (वय ३७) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार मझेर शनिवारी सकाळी पाचच्या सुमारास एनआयबीएम रस्त्याने निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण अब्दागिरे तपास करत आहेत.

बोपदेव घाटात टेम्पो दरीत कोसळला

कोंढवा-सासवड रस्त्यावरील बोपदेव घाटात टेम्पोत दरीत कोसळून टेम्पोचालकासह तिघे जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. नूर पाशा खाजा जमादार, अमोल आदिनाथ चव्हाण, शुभम चौगुले (रा. शनीनगर, कात्रज) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार तुषार डिंबळे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपदेव घाटातून रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भरधाव टेम्पो निघाला होता. टेम्पोने एका मोटारीला धडक दिली. टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो दरीत कोसळला. टेम्पोचालकासह टेम्पोतील सहप्रवासी जखमी झाले. टेम्पोच्या धडकेत मोटारीचे नुकसान झाले. सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव तपास करत आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply