Pune : लष्कराचा इतिहास, शौर्याचे जवानांच्या पत्नींकडून कथन; युद्ध स्मारक, संग्रहालय येथे टूर गाईड म्हणून नियुक्ती

Pune : महिला सशक्तीकरणाचे अनोखे उदाहरण लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाने समोर ठेवले आहे. लष्करी कुटुंबातील असलेल्या चार महिलांची पुण्यातील युद्ध स्मारक आणि मुख्यालय संग्रहालय येथे टूर गाइड म्हणून नियुक्ती झाली असून, लष्कराचा देदीप्यमान इतिहास त्या कथन करत आहेत.

वीरनारी असलेल्या विजया सकपाळ यांच्यासह निवृत्त सैनिकाची पत्नी असलेल्या शारदा उम्बरकर, तसेच सध्या सेवा देत असलेल्या जवानांच्या पत्नी कल्याणी भोसले, मुक्ता चव्हाण यांची टूर गाइड म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यासाठीचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून युद्ध स्मारक आणि संग्रहालयाला भेट देणारे पर्यटक, विद्यार्थी यांना स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील युद्धे, लष्करी उपकरणे आणि लष्कराची कामगिरी याबाबत सविस्तर माहिती दिली जाते.

Rohini Khadse : “महिलांना एक खून माफ करा”, महिला दिनी रोहिणी खडसेंचं राष्ट्रपतींना पत्र; म्हणाल्या…

मुक्ता चव्हाण यांचे पती मणिपूर येथे लष्करी सेवेत आहेत. टूर गाइड या उपक्रमाबाबत त्या म्हणाल्या, ‘रीतसर निवड चाचणी घेऊन संवादकौशल्याच्या आधारे चौघींची निवड करण्यात आली. टूर गाइड म्हणून काम करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. त्यात लष्कराचा इतिहास, दक्षिण मुख्यालयाच्या परिसराचा इतिहास याची माहिती देण्यात आली. यासाठी ‘आर्मी वाइव्ह्ज वेलफेअर असोसिएशन’ने खूप मदत केली. या उपक्रमातून आम्हाला घरातून बाहेर पडून काम करण्याची, स्वतःच्या पायावर उभे राहण्याची, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची संधी मिळाली आहे. घरच्या जबाबदाऱ्या सांभाळतानाच काम करता येत असल्याचा नक्कीच आनंद वाटतो.

युद्ध स्मारक आणि संग्रहालय पाहण्यासाठी शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, कुटुंबे, ज्येष्ठ नागरिक, पर्यटक येतात. त्यांना आयएनएस त्रिशूलची प्रतिकृती, रणगाडा, मिग २३ या लढाऊ विमानाची प्रतिकृती, क्षेपणास्त्रे, परमवीरचक्र प्राप्त जवानांची कामगिरी याची माहिती दिली जाते. तसेच राजस्थान दालन, दक्षिण भारत दालनासह मराठा गॅलरीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांपासूनचा इतिहास, युद्धनीती सांगितली जाते. त्याशिवाय दक्षिण मुख्यालयातील दालनेही दाखवली जातात, असे मुक्ता चव्हाण यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply