Pune Water Shortage: पुणेकरांनो ऐकलं का! शहरातील खराडी, चंदननगर आणि वडगाव शेरीमध्ये शुक्रवारी बंद राहणार पाणीपुरवठा

Pune : पुणेकरांसाठी कामाची बातमी आहे. शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. चंदननगर येथील पाण्याच्या टाकीच्या मुख्य जलवाहिनीचे तातडीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी 28 तारखेला खराडी, चंदननगर व वडगाव शेरी तसेच लष्कर जलकेंद्रावर अवलंबून असलेल्या परिसरात पाणी पुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेडून करण्यात आले आहे.

जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम होत असल्याने आनंद पार्क, सुनीता नगर, गणेश नगर, स्वामी समर्थ, नामदेव नगर, मते नगर, पुण्य नगरी, महावीर नगर, मुनावर सोसायटी, माळवाडी या परिसरातील खराडी, चंदन नगर, वडगाव शेरी या भागातील पाणीपुरवठा दिवसभर पूर्णपणे बंद राहणार आहे. काम झाल्यानंतर शनिवारी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आलीय.

दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरही, शनिवार, 1 मार्च 2025 रोजी, या भागातील रहिवाशांना कमी दाबाने आणि विलंबाने पुरवठा होईल. रहिवाशांनी या काळात पुरेशा प्रमाणात पाणी साठवून ठेवावे आणि पालिका अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. भविष्यात चांगले आणि अखंड पाणी वितरण सुनिश्चित करण्यासाठी दुरुस्तीचे काम आवश्यक आहे.

नागपूर शहरातही पाणी पुरवठा बंद

उन्हाळाच्या पार्श्वभूमीवर देखभाल दुरूस्तीसाठी ओसीडब्ल्यू आणि महानगर पालिकेकडून 27 फेब्रुवारीला शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. 27 फेब्रुवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 10 पर्यंत पाणीपुरवठा बंद असणार आहे. पेज 1 मधून होत असलेल्या शहरातील 13 जलकुंभावर उद्या पाणीपुरवठा खंडित असणार आहे.

शहरातील सीताबर्डी कमांड एरिया, वंजारीनगर जुने आणि नवीन, रेशीमबाग कमांड एरिया, मेडिकल फिडर कमांड एरिया, सेंट्रल रेल्वे लाईन, लष्करीबाग कमांड एरिया, गोरेवाडा, सादर याभागात 24 तास पाणी पुरवठा नसणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply