Pune : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा भव्य सोहळा

Pune : ईएसआयसी एससी/एसटी कर्मचारी-अधिकारी संघ आणि ईएसआयसी कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ईएसआयसी उप-प्रादेशिक कार्यालय, पुणे येथे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संयुक्त संचालक प्रभारी श्री. सुकांता चंद्र दास यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर कुमारी उन्नती कवटे यांनी जोशपूर्ण शिवगर्जना सादर केली, ज्यामुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले.

उपसंचालक श्री. राजेश सिंह यांनी आपल्या भाषणात सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार राष्ट्रीय ऐक्यासाठी प्रेरणादायी आहेत. एससी/एसटी अधिकारी व कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्री. वैभव दूधमल यांनी सांगितले की शिवाजी महाराज राष्ट्रवाद आणि स्वातंत्र्य चळवळीचे महान प्रेरणास्थान होते. तसेच, ईएसआयसी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्री. सतीश बाबर यांनी त्यांना एक आदर्श शासक म्हणून संबोधले, ज्यांच्या धोरणांचा प्रभाव आजही समाजावर आहे.

Nagpur Crime : नागपूर हादरले; लग्न मंडपातच हत्या, दुसऱ्या घटनेत किरकोळ वादातून मित्राचा खून

आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. सुकांता चंद्र दास यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजात समानता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांनी राष्ट्रनिर्माणात दिलेल्या योगदान अधोरेखित करत , भारतीय समाजासाठी त्यांचे योगदान अद्वितीय आहे आणि ते सदैव प्रेरणास्थान राहतील, असे नमूद केले. त्यांनी सर्व उपस्थितांना शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करून ते समाजात पोहोचवण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. एकात्मता आणि राष्ट्रवाद वाढवण्यासाठी हा सोहळा दरवर्षी या संघटनांकडून आयोजित केला जातो.

कार्यक्रमाचे सुयोग्य संचालन श्री. निखिल उगले यांनी केले, तर श्री. पंकज बेल्हेकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



महाराष्ट्र

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply