Pune : धक्कादायक! मोठ्या सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये सुरू होता गॅस भरणा, पुणे पोलिसांनी केला रॅकेटचा भांडाफोड

Pune Crime News Update : बेकायदेशीरित्या घरगुती वापराच्या मोठ्या सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरणाऱ्या दुकानावर मार्केट यार्ड पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये भरलेले व रिकामे छोटे मोठे सिलिंडर जप्त करण्यात आले. या प्रकरणी नवाज उर्फ सलीम गुलाब शेरीकर (वय 35) याला ताब्यात घेण्यात आले.

आंबेडकर नगर येथील गल्ली नंबर 4 येथे अवैधरीत्या व बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करून मिळतो, अशी माहिती मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील यांना मिळाली होती. पोलिस ठाण्याच्या पथकाने तात्काळ आंबेडकर नगर येथील गल्ली नंबर 4 येथील दावल एंटरप्राइजेस या दुकानांमध्ये छापा टाकला. यावेळी पोलिसांना या ठिकाणी बेकायदेशीरपणे घरगुती वापराचे मोठ्या गॅस सिलेंडरमधून लहान गॅस सिलेंडरमध्ये निष्काळजीपणे, गॅस रिफिलिंग करून देण्याचे काम बेकायदेशीरपणे चालू होते.

Pune : महिलांची छेड काढाल तर भर चौकात मारू, पुणे पोलिसांचा भाईंना सज्जड दम

या ठिकाणची अधिक पाहणी केली असता त्या ठिकाणी गॅस रिफिलिंगसाठी लागणारे सर्व सामान आम्हास मिळून आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या यांच्या पथकाने केली.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply