Pune : पुण्यात हिंदी-मराठी वाद पेटला, मनसे कार्यकर्त्यांनी एअरटेलच्या कर्मचाऱ्याला धू धू धुतला, नेमकं काय झालं?

 

Marathi-Hindi dispute, Pune : मुंबई, ठाण्यानंतर आता पुण्यातही मराठी-हिंदी वादाला तोंड फुटले आहे. मुंब्र्यामध्ये फळ विक्रेत्याबरोबर झालेल्या वादातून जमावाकडून मराठी तरुणाला माफी मागायला लावण्याचा संतापजनक प्रकार ताजा असतानाच आता पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्यात मराठी कर्मचाऱ्यावर अन्याय कऱण्यात आल्याचं समोर आलेय. एअरटेलच्या कार्यलयात हा प्रकार घडलाय. मनसे कार्यकर्त्यांनी मराठी माणसावर अन्याय करणाऱ्या एअरटेलच्य टीम लीडरला धू धू धुतलेय.

ठाण्यानंतर पुण्यात हिंदी-मराठी वाद पेटला आहे. मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल, वाकडेवाडी येथील शाहबाज अहमद या टीम लीडरला मनसे स्टाईल चोप दिला. एअरटेलच्या कर्मचारी वर्गाला फ्लोअरवर हिंदीच बोलायचं, मराठी बोलले तर कामावरून काढून टाकेल, असा सज्जाड दम दिला होता. त्या एअरटेल टीम लीडरला मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिलाय.

PUBG Train Accident : रेल्वे रूळावर बसून पबजी खेळत होते, रेल्वेनं उडवलं; तिघांचा मृत्यू

 
हिंदू सणांना सुट्टी न देणे तसेच गेले ३ महिने सदर मराठी पोरांचा पगार केला नाही. त्यावर येथील कामगारांनी मनसेकडे तक्रार केली की आमचा पगार थांबवला आहे. त्या शाहबाज अहमदने आपल्या मराठी पोरांना धमकी दिल्याची तक्रार मनसेकडे करण्यात आली. “कोनसी भी सेना लेके आओ नही बोलता मराठी आणि कामावरून काढून टाकतो बघू कोण येतंय?” अशी धमकी त्याने दिली होती. त्याला मनसेने आपल्या स्टाईलने उत्तर दिलेय.
 

या मराठी पोरांच्या अन्यायाला काल मनसे स्टाईल वाचा फोडली आणि येत्या सोमवारी पोरांचे पगार करायला लावले आहेत. अन्यथा एकाच वेळी एकाच दिवशी स्वारगेट, वाकडेवाडी, खराडी येथील ३ एअरटेल ऑफिस फोडून टाकणार, असा अंतिम इशारा मनसे कडून राज्य सचिव आशिष साबळे पाटील यांनी दिला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply