Pune : कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचविण्याचा आरोप वडगाव शेरीचे आमदार आणि महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्यावर झाला होता. हा अपघात झाला त्यावेळी आमदार टिंगरे हे अपघातग्रस्तांना बघण्यासाठी रुग्णालयात न जाता या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते. तेथे त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप केला जात आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी आमदार टिंगरे हे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून निवडणूक लढवीत आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वी झालेले पोर्शे कार अपघात प्रकरण त्यांच्यासाठी अडचणीचे ठरत आहे. निवडणूक प्रचारात या प्रकरणाचा वापर करून विरोधक त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसतानाही विनाकारण याचे राजकारण केले जात असल्याने आमदार टिंगरे यांनी माझी बदनामी केली तर न्यायालयात खेचीन असा इशारा देत महाविकास आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांना नोटीस पाठविली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देखील ही नोटीस दिल्याचे समोर आले होते. या नोटीसमध्ये पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे आणि वडगाव शेरीतील प्रतिस्पर्धी उमेदवार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांचेही नाव असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण अधिकच वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
Pune : पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील |
वडगाव शेरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार बापू पठारे यांच्या प्रचारसभेत दोन दिवसांपूर्वी खासदार सुळे यांनी, टिंगरे यांनी दिलेल्या नोटिशीबाबत सांगितले होते. ‘ज्येष्ठ नेते शरद पवार सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) नोटिशीला घाबरले नाहीत, ते तुझ्या नोटिशीला घाबरतील का,’ अशा शब्दांत खासदार सुळे यांनी जाहीर सभेत आमदार टिंगरे यांचा समाचार घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर टिंगरे यांनी पाठविलेली नोटीस चर्चेत आली होती.
टिंगरे यांनी वकिलामार्फत महाविकास आघाडीत सहभागी असलेले राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (ठाकरे), तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नावाने ही नोटीस पाठवली आहे. त्यामध्येच खासदार सुप्रिया सुळे आणि सुरेंद्र पठारे हे विविध माध्यमांतून पोर्शे कार प्रकरणात आपले नाव घेऊन टीका करत असल्याचा उल्लेख आहे. या नोटिशीच्या प्रती सध्या समाज माध्यमांवरून फिरत आहेत.
शहर
- Pune : राडारोडा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास अधिकाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई !
- Milk Tanker Accident : शिंदवणे घाटात दुधाच्या टँकरचा अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर
- Pimpri Chinchwad Crime : मित्रांच्या मदतीने एकावर जीवघेणा हल्ला; लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याच्या रागातून घटना
- Vande Bharat Sleeper : मुंबईत धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन, ट्रायल रनचे व्हिडीओ व्हायरल
महाराष्ट्र
- Hydrogen Train : मुंबई किंवा दिल्ली नाही तर या ठिकाणाहून धावणार सर्वात पहिली हायड्रोजन ट्रेन
- Dhule Fraud Case : एमएसईबी अधिकारी असल्याची बतावणी करत लाखोंचा गंडा; धुळे सायबर पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात
- Ulhasnagar Crime : फेसबुकच्या मैत्रीतून साधली जवळीक; ब्लॅकमेल करून लग्न, नंतर घडले ते भयंकर
- Chinchani Village : दोनशे लोकवस्तीच्या गावात एक कोटीची उलाढाल; वर्षभरात चिंचणीला २५ हजार पर्यटक दाखल
गुन्हा
- Pune : मद्यधुंद तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण; मगरपट्टा परिसरातील घटना
- Madhya Pradesh Crime : श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती! विवाहित व्यक्तीकडून लिव्ह-इन पार्टनरची हत्या, ८ महिने मृतदेह फ्रिजमध्ये
- Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार उघड; शाळेतील मुलींचे चेंजिंग रूमध्ये कपडे बदलताना केले व्हिडिओ शूटिंग
- Mumbai : तरुणीचे केस कापले, नंतर बॅगेत भरून घेऊन गेला; दादर स्टेशनवरील धक्कादायक प्रकारानं खळबळ
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- MahaKumbh 2025 : महाकुंभातलं पहिलं अमृतस्नान; अडीच कोटी भाविकांची संगमावर डुबकी
- Mahakumbh Mela 2025 : संगमावर पहिल्याच दिवशी ४० लाख लोकांचा स्नान सोहळा, संगमात स्नानाचा उत्सव
- Maha Kumbh 2025 : महा कुंभमेळ्यासाठी रेल्वेचे खास नियोजन; रेल्वेसह यात्रेकरुंसाठी विशेष सुविधा
- Madhya Pradesh Crime : श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती! विवाहित व्यक्तीकडून लिव्ह-इन पार्टनरची हत्या, ८ महिने मृतदेह फ्रिजमध्ये