Pune : कोणत्या फटाक्यांमुळे नेमकं किती प्रदूषण ? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चाचणीचे धक्कादायक निष्कर्ष

Pune : दिवाळीच्या काळातील फटाक्यांच्या आवाजामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची वारंवार चर्चा होते. प्रत्यक्षात प्रत्येक फटाक्यापासून ध्वनिप्रदूषण होत असल्याची बाब महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ताज्या आकडेवारीतून समोर आली आहे. यामुळे फटाके वाजविल्यानंतर प्रदूषण होणार असल्याने त्यावर कारवाई कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दरवर्षी फटाक्यांच्या आवाजाची चाचणी घेतली जाते. यंदाही फटाक्यांच्या आवाजाची चाचणी घेण्यात आली. यातील सर्वच फटाके आवाजाच्या चाचणीत नापास झाले आहेत. कारण सर्व फटाके ध्वनिप्रदूषणाच्या निश्चित पातळीपेक्षा जास्त आवाज करीत आहेत. निवासी क्षेत्रात दिवसा ५५ डेसिबल तर रात्री ४५ डेसिबल आवाज ध्वनिप्रदूषण ठरतो. याचवेळी शांतता क्षेत्रात ही मर्यादा दिवसा ५० आणि रात्री ४० डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५ आणि रात्री ५५, औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ आणि रात्री ७० डेसिबल अशी आहे. या सर्व विभागांतील कमाल मर्यादा पातळीपेक्षा छोट्या फटाक्यांचा आवाजही अधिक आहे. यामुळे ध्वनिप्रदूषण नियमांचा भंग होत आहे.

Mumbai : ‘शासन आपल्या दारी’चा देशात गौरव



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply