Pune : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध, पुण्यात शरद पवार गटाकडून तीन तोंडी रावणाचे दहन

Pune : मागील काही महिन्यांपासून महिला, लहान मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत आहे. या अन्याय अत्याचाराच्या घटनांविरोधात राज्यभरात विविध संघटनांमार्फत आंदोलन करण्यात येत आहे. आज पुण्यातील गुडलक चौकात शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली ‘वध तीनतोंडी रावणाचा, लढा स्त्री सन्मानाचा’ या आशयाचे मजकूर असलेले फलक हाती घेऊन महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. हे फलक मेणबत्तीने पेटवून महिलांवरील अत्याचाराविरोधात निषेध नोंदवण्यात आला.

फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो होते. राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करीत हे फलक मेणबत्तीने पेटवून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की, राज्यातील अनेक भागांत दररोज प्रत्येक क्षणाला महिला, लहान मुलीवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. तसेच शाळा, महाविद्यालय परिसरात रोडरोमिओकडून मुलींना त्रास देण्याच्या घटना घडत आहेत.

Pune : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना तालमीतील मित्र त्यांच्याच बंदोबस्तासाठी भेटतो तेव्हा…

या सर्व घटना लक्षात घेतल्यावर राज्यातील महिला, मुली सुरक्षित नाही आणि दुसर्‍या बाजूला राज्यातील मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री दौरे, बैठका घेत आहेत. या सरकारला कोणाचेही काही देणेघेणे नाही. हे असंवेदनशील सरकार आहे. त्यामुळे हे सरकार राज्यपालांनी बरखास्त करावे, तसेच अन्याय अत्याचार करणार्‍या नराधमांना तातडीने शिक्षा करावी, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply