पावसाचा फटका! पुण्यात ‘इतकी’ कोसळली झाडे!

Pune : पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात झाडे पडण्याच्या घटना घडल्या. रविवारी सायंकाळपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात १९ ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

शहर परिसरात शनिवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. मध्यरात्रीनंतर शहरात मुसळधार पाऊस झाला. रविवारी सकाळी पावसाचा जोर ओसरला. रविवारी दिवसभरात वेगवेगळ्या भागात झाडे पडल्याच्या घटना घडल्या.

Alibaug : अतिवृष्टीमुळे रायगडात पूरस्थिती; नागोठणे, आपटा, खोपोली परिसराला पुराचा तडाखा

कोथरुड परिसरातील एमआयटी महाविद्यालयाजवळ, कोंढव्यातील एनआयबीएम रस्ता, गंज पेठ, हडपसर भागातील १५ नंबर चौक, कोथरुड बस डेपो, पाषाण, जनवाडीतील अरुण कदम चौक, प्रभात रस्ता, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, वडारवाडी, कसबा पेठ, बिबवेवाडी, पाषाण येथील वीरभद्रनगर, कोथरुडमधील सुतार दवाखाना, महंमदवाडी, नऱ्हे अभिनव काॅलेजजवळ, मुकुंदनगर, विश्रांतवाडी भागात झाडे कोसळली. झाडे कोसळल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यात पडलेल्या फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस खुले करून दिले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply