Pune Crime: पुण्यात चाललंय काय? तरुणीचे अपहरण करून विनयभंग, बोपदेव घाटातील दुसरी घटना

 

Pune : पुण्यामध्ये गुन्हेगारांना पोलिसांचा वचक राहिला नसल्याच्या एकापाठोपाठ एक घटना समोर येत आहेत. पुण्यामध्ये महिला सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुण्यातील लाडक्या बहिणींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. बोपदेव घाटामध्ये २१ वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच याच ठिकाणी आणखी एका तरूणीचे अपहरण करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पुण्यामध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ दिवसांपूर्वी पुण्यातील बोपदेव घाटात तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. ही तरुणी मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला केली होती. या तरुणीचे कारमधून अपहरण करून तिचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाला अटक केली आहे.


या तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ मोटारचालक राजेखाँ करीम पठाण (३६ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. तक्रारदार तरुणी मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेली होती. त्यावेळी राजेखाँ करीम पठाण मोटारीतून तेथे आला. त्याने एका मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याची बतावणी केली. या ठिकाणी जोडप्यांना बंदी आहे, असे सांगून त्याने तरुणी आणि तिच्याबरोबर असलेल्या मित्राचे मोबाइलमध्ये फोटो काढले.

तरुणीला धमकावून आरोपीने तिला कारमध्ये बसण्यास सांगितले. त्यानंतर हा कार कोंढव्यातील खडी मशीन चौकात नेली. तेथील एका गल्लीत कार थांबवून आरोपीने तरुणीचा विनयभंग केला. त्यानंतर तरुणीला खडी मशीन चौकात सोडून आरोपी राजेखाँ करीम पठाण पसार झाला. पीडित तरुणीने आरोपीविरोधात तक्रार केल्यानंतर हे प्रकरण समोर आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply