
Pune : वैभवशाली परंपरा असलेल्या विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांनी ३०० नागरिकांचे मोबाइल संच चोरून नेले. याप्रकरणी मध्यभागातील फरासखाना, विश्रामबाग, खडक, समर्थसह वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सर्वाधिक मोबाइल संच चोरीच्या घटना विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या असून, मुख्य मिरवणूक मार्गावर चोरट्यांनी ९१ मोबाइल संच चोरले.
फरासखाना पोलिसांनी मध्यप्रदेश आणि नाशिक येथील मोबाईल चोरांच्या टोळीतील दोघांना पकडून दोन लाख ७९ हजाराचे २१ मोबाइल संच जप्त केले. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी मोठी गर्दी झाली होती. सर्वाधिक गर्दी लक्ष्मी रस्त्यावर झाली होती. बेलबाग चौक ते लोकमान्य टिळक चौकात मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना घडल्या. उत्सवाच्या कालवधीत दहा दिवसात मध्यभागातून २५ मोबाइल चोरीच्या घटनांची नोंद पोलिसांनी केली. विसर्जन मिरवणुकीत सर्वाधिक मोबाइल चोरीच्या घटना घडल्या. मोबाइल, तसेच दागिने चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी साध्या वेशातील पथके तैनात केली होती, तसेच ध्वनीवर्धकावरुन पोलिसांनी मोबाइल, दागिने चोरांपासून सावध रहा, असे आवाहन केले होते.
|
Pune : ‘ईवाय’मधील ‘सीए’ तरुणीच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय कामगार राज्यमंत्र्यांची मोठी घोषणा |
फरासखाना पोलिसांच्या पथकाने मोबाइल चोरटे फैजल अजीज खान (वय २२,रा.नाशिक) आणि कालू राजू पारख (रा.मध्यप्रदेश) यांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, गजानन सोनुने, नितीन जाधव यांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून २१ मोबाइल संच जप्त करण्यात आले.
उत्सवाच्या काळात परराज्यातून मोबाइल चोरट्यांच्या टोळ्या शहरात येतात. चोरटे गर्दीत नागरिकांकडील मोबाइल संच चोरून पसार होता. मोबाइल चोरल्यानंतर त्वरीत सीमकार्ड फेकून दिले जाते. फरासखाना पोलिसांनी नाशिक आणि मध्यप्रदेशातील दोन चोरट्यांना पकडले. – प्रशांत भस्मे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस
महिलांची टोळी गजाआड
मोबाइल चोरट्यांनी महागडे मोबाइल संच लांबविल्याचे उघडकीस आले आहे. नागरिकांनी याबाबत पोलिसांकडे तक्रारी दिल्या आहेत. फरासखाना पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील महिलांच्या टाेळीला अटक केली. तपासात महिलांनी नवी मुंबईत दागिने चोरल्याचे उघडकीस आले. गीता वेंकटेश खट्टी (वय २०), पूजा प्रविण गाझु (२४, दोघी रा. पाथर्डी, नाशिक) यांना अटक करण्यात आली. तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, गजानन सोनुने, रेखा राऊत यांनी ही कारवाई केली.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


