Pune News: बनावट तिकीटानंतर जागेवरुन हाणामारी, प्रवाशाने विमानात सिगरेट ओढली; दिल्ली-पुणे विमानात काय घडलं?

Pune  : विमानात ज्वलनशील ज्वलनशील पदार्थ नेण्यास किंवा सिगारेट ओढण्यास बंदी असतानाही दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या विमानात एका प्रवाशाने स्वच्छतागृहात जाऊन सिगारेट ओढत मद्यपान केल्याचा धक्कादायक प्रकार भडला आहे. इंडिगो एअरलाइन्स विमानात ही घटना घडली. लोहगाव विमानतळावर विमान उतरल्यानंतर पोलिसांनी सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

नक्षब जहांगीर (वय ३८, रा. ओखला विहार नवी दिल्ली, सध्या रा. बाणेर) असे गुन्हा दाखल केलेल्या प्रवाशाचे नाव आहे. या प्रकरणी इंडिगोचे सुरक्षा अधिकारी प्रतिक पावले (रा. टिंगरेनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'इंडिगो कंपनीचे विमान सोमवारी मध्यरात्री दीड वाजता दिल्लीहून पुण्याकडे येण्यासाठी झेपावले. सुरक्षेच्या कारणास्तव विमानातून ज्वलनशील पदार्थ नेण्यास आणि सिगारेट ओढण्यास बंदी आहे. याची माहिती असतानाही प्रवाशी जहांगीर याने विमान हवेत असताना स्वच्छतागृहात जाऊन सिगारेट ओढली. स्वच्छतागृहा शेजारील केबिन क्रूहवाई सुंदरी यांना सिगारेटचा वास आला. त्यांनी स्वच्छता गृहात सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाला याबाबत जाब विचारला असता त्या प्रवाशाने याची कबुली दिली. त्यानंतर पुणे विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. लोहगाव विमानतळावर विमान उतरल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्वच्छतागृहाची पाहणी केल्यावर सिगारेट ओढल्याचे दिसून आले.

Pune : लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून रिक्षात ठेवला मृतदेह, प्रियकर फरार

विमानतळ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी विमानतळ पोलिसांना याबाबत सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. या प्रवाशावर बंदी असतानाही विमानात सिगारेट ओढून स्वतःचा आणि विमानातील सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात घातला, म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी हा उच्चशिक्षित असून पुण्यात एका बड्या कंपनीत नोकरीला आहे.

आधी बनावट तिकीट, नंतर जागेवरून हाणामारी...

लोहगाव विमानतळावर बनावट तिकीट काढून एका तरुणाने इंडिगो विमानातून प्रवास करण्याचा प्रयत्न महिन्याभरापूर्वी झाला होता. त्यानतंर आठ दिवसांनी पुणे दिल्ली विमान झेपावण्यापूर्वी बसण्याच्या जागेवरुन एका महिलेने प्रवाशी दांपत्यांशी वाद घातला आणि त्यांना मारहाण केली.विमानातील भांडणे सोडवण्यासाठी आलेले 'सीआयएसएफ' महिला पोलिसालाही त्या प्रवाशाने मारहाण करून घ्या हाताचा चावा घेतल्याचा प्रकार घडला होता.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply