Pune: तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार, उपचारादरम्यान २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

 

Pune  : घराच्या समोर राहणाऱ्या युवकाने २२ वर्षीय युवकाला पोते उचलायचे आहे, असे सांगून घराबाहेर नेले. त्यानंतर युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. उत्तमनगर येथील जुनी मासे आळी येथे रविवारी (दि. ८) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

जयदीप ज्ञानेश्वर भोंडेकर (२२, रा. गुजर कॉम्प्लेक्स, मासे आळी, उत्तमनगर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर, अमित सुदाम गुजर (२१, रा. सदर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जयदीपची आई लक्ष्मी भोंडेकर (४२) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : चिकुनगुनियामुळे मुलांमध्ये मेंदूच्या आवरणाला येतेय सूज; खबरदारी घेण्याचे आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयदीप रविवारी दुपारी घरात झोपलेला होता. आरोपी अमित त्याच्या घरी आला. त्याने ‘दादा पोतं उचलायला जायचे आहे माझ्या सोबत चल’ असे म्हणत तो जयदीपला घराबाहेर घेऊन गेला. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी भोंडेकर याच्यावर कोयत्याने वार केल्याचे आई लक्ष्मी भोंडेकर यांना समजले. त्या जयदीपच्या मित्रांसोबत जुनी मासे आळीतील घर नं. ७९६ या घराजवळ गेल्या असता जयदीप रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.

यानंतर जयदीपला उचलून रिक्षाने खासगी रुग्णालयात नेले. दरम्यान, जयदीपने अमित गुजर याने डोक्यात कोयता मारल्याचे त्याच्या आईला सांगितले. यानंतर जयदीपवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी (दि. ८) सकाळी त्याचा मृत्यू झाला. अमित गुजर याने नेमका खून कशासाठी केला, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन खंदारे यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply