11th Admission : नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी स्पर्धा; अकरावीची प्रक्रिया, पहिल्या फेरीचा कटऑफ ९२ टक्क्यांपेक्षा जास्त

Pune  : इयत्ता अकरावीच्या पहिल्या नियमित फेरीत शहरातील नामांकित महाविद्यालयाचा कटऑफ हा १२ टक्क्यांपुढे गेला आहे. विशेषतः इंग्रजी माध्यमातून कला शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी सर्वाधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळाला आहे. त्या खालोखाल विज्ञान शाखेतील प्रवेशाचा कटऑफ आहे. शहरातील नामांकित महाविद्यालयातील विज्ञान शाखेपेक्षाही इंग्रजी माध्यमातून कला शाखेचा कटऑफ हा जास्त असल्याचे दिसून येते. त्यामुळे ९० पेक्षा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी आणखी फेत्र्यांची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी पहिल्या नियमित फेरीची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये ९१ टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येच मोठी स्पर्धा असल्याचे दिसून आले. मात्र, तरीही ८५ टक्के ते ९० टक्क्यांपर्यंत गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Devendra Fadnavis : जयंतराव खोटं बोलायचं‌ तरी किती? देवेंद्र फडणवीस अचानक इतके आक्रमक का झाले ?

यंदा फर्ग्युसन महाविद्यालयातील कला शाखेचा (इंग्रजी माध्यम) कटऑफ ९६.६ टक्के इतका आहे. तर या महाविद्यालयात विज्ञान शाखेचा कटऑफ ९५.६ टक्के आहे. तर लक्ष्मणराव आपटे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा कटऑफ ९५.८ टक्के असून हा विज्ञान शाखेतील शहरातील सर्वाधिक कटऑफ आहे. बीएमसीसी महाविद्यालयातील ९५.८ टक्के हा वाणिज्य शाखेतील सर्वाधिक कटऑफ आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा अकरावीच्या प्रवेशाचा कट ऑफ वाढल्याचे दिसून येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply