Vanraj Andekar : मारा, मारा... दोघांना सोडू नका; भावावर हल्ला होताना बहीणीची गॅलरीतून हल्लेखोरांना चिथावणी

Pune : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणात दोघांना अटक करण्यात आलीय. तर आंदेकर यांची बहीण, मेहुणा, भाच्यासह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यात आरोपी संजीवनी कोमकर ही वनराज आंदेकर यांची बहीण तर जयंत हे मेहुणा आहे. कौटुंबिक वादातूनच वनराज आंदेकरची हत्या झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. तर हल्ला झाला तेव्हा बहीण संजीवनी गॅलरीतच उभा होती आणि तिने हल्लेखोरांना चिथावणी दिली असा आरोप वनराज यांच्या वडिलांनी केलाय.

Pune Firing : महिनाभरापूर्वीच रचला होता हत्येचा कट, आंदेकरांना का संपवलं? पोलीस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर

नाना पेठेतील चौकात वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी रात्री गोळीबार करण्यात आला. त्यानंतर कोयत्याने वार केले. हे वार वर्मी लागून वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला. जेव्हा हल्ला केला जात होता तेव्हा तिथेच गॅलरीत वनराज यांची बहीण संजीवनी थांबली होती. तिने हल्लेखोरांना चिथावणी देत, “मारा मारा, दोघांना सोडू नका” असे ओरडून सांगितल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *