Pune : पाऊस दमदार, तरी पाणीपुरवठा बंद! पिंपरी-चिंचवडकरांनो पाणी जपून वापरा

Pune : यंदा पिंपरी-चिंचवड धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाला, धरणं काठोकाठ भरली. त्यामुळे इथली पाण्याची समस्या वर्षभरासाठी मिटली असं वाटत होतं खरं, परंतु शहरात मात्र उलटच चित्र पाहायला मिळतंय.

चांगला पाऊस झालेला असतानाही इथला पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पिंपरी-चिंचवडच्या काही भागांमध्ये आज, 3 सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असून उद्या, 4 सप्टेंबरला पाणी कमी दाबानं येईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असं आवाहन करण्यात आलंय.

Pune : मोठी बातमी ! बुधवार पेठसह पुण्यातील तीन मेट्रो स्टेशनची नावं बदलणार

पिंपरी-चिंचवडच्या महापालिका ई क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या भोसरी, शांतीनगर, संत तुकाराम नगर, दिघी, बोपखेल, मॅगझीन, वडमुखवाडी, गजानननगर, बी.यु. भंडारी, इंद्रायणीनगर टाकी परिसरातील पाणीपुरवठा 3 सप्टेंबरला बंद असेल. तर, 4 सप्टेंबरला इथं पाणीपुरवठा कमी दाबानं होईल. ई क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता अजय सूर्यवंशी यांनी याबाबत माहिती दिली.

महानगरपालिकेच्या मुख्य जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात गळती होतेय. या जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल. परिणामी पिंपरी-चिंचवडकरांना 2 दिवस पाणीटंचाईला सामोरं जावं लागणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply