Pune : ‘ससून’ची बदनामी थांबवा! रुग्णालयाचे कर्मचारी आक्रमक; मोर्चाद्वारे थेट जिल्लाधिकारी कार्यालयावर धडकले

Pune : ससून सर्वोपचार रुग्णालयाची नाहक होणारी बदनामी तातडीने थांबवावी, या मागणीसाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ससूनमधील डॉक्टर, परिचारिकांसह कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

मागील काही काळात ससूनमध्ये गैरप्रकार घडले. यामध्ये काही मोजक्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असताना संपूर्ण रुग्णालयाची बदनामी केली जात आहे, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली बुधवारी मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस असोसिएशन, लिपिक परिचारिका ससून रुग्णालय शाखा, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, बहुजन अधिकारी कर्मचारी संघटना, सर्व मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, समाजसेवा अधीक्षक कार्यालय, राज्य सरकारी गट-ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या संघटनांचे कर्मचारी मोर्चात सहभागी झाले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला आणि तिथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Dhule Laling Waterfall : मित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; धुळ्याजवळील लळींग धबधब्यावरील घटना

 

काही संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून वारंवार ससूनची बदनामी होत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे, की रुग्णालयाची बदनामी करताना येथे काम करीत असलेल्या पाच हजार कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. रुग्णालयात क्षमतेपक्षा जास्त रुग्ण असूनही पदभरती होत नाही. विविध संघटना आणि लोकप्रतिनिधी समस्या सोडविण्यापेक्षा सरकारी कामात अडथळा आणत आहेत. काही संघटना डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना त्रास देत आहेत. त्यामुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा होणारा त्रास थांबवावा.

 

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या

-रुग्णालयात नियमबाह्य शक्तींना आळा घालणे.
-वर्ग-ड च्या कर्मचाऱ्यांची भरती सरळ सेवेने करावी.

-ठेकेदारी पद्धत, खासगीकरण, कंत्राटीकरण रद्द व्हावे.
-कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बाहेरील संघटनांना मज्जाव करावा.

-रुग्णांना औषधे व वैद्यकीय साधने मोफत उपलब्ध करून द्यावीत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply