Memu Train : 'मेमू'साठी रेल्वेच्या दोन विभागांची 'धावाधाव'; पुणे व भुसावळ विभागांत रस्सीखेच

Pune  - पुणे-दौड दरम्यान सध्या धावत असलेली 'मेमू' (मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) ही पुणे विभागातच राहावी म्हणून पुणे विभाग प्रयत्नशील आहे, तर मेमूचा रेक तात्पुरत्या स्वरूपात आम्ही पुण्याला दिला असून तो आम्ही कसल्याही परिस्थितीत परत घेऊ, अशी आक्रमक भूमिका भुसावळ विभागाने घेतली आहे. त्यामुळे पुणे आणि भुसावळ रेल्वे विभागात 'मेमू'साठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

पुणे - दौड स्थानकादरम्यान धावणारी 'डेमू' (डिझेल इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) पीओएच'साठी (देखभाल वा दुरुस्ती) माटुंगा येथील वर्कशॉप येथे पाठविण्यात आला. दुरुस्ती झाल्यावर १६ जूनला 'डेमू'चा रेक पुण्यात दाखल होईल. त्यानंतर 'मेमू'चा रेक भुसावळला पाठविण्यात येणार आहे. त्या शर्तीवरच 'मेमू'चा रेक पुण्याला देण्यात आल्याने तो रेक पुन्हा भुसावळला जाण्याची शक्यता अधिक आहे. हे लक्षात घेऊनच पुणे विभाग देखील मध्य रेल्वेच्या मुख्यालयावर 'दबाव' निर्माण करीत आहे.

Mahavitaran : महावितरणच्या कार्यालयांना आता 'स्मार्ट मीटर'पहिल्या टप्प्यात स्मार्ट मीटर

आता जनरेटा आवश्यक

दौड वासियाना जर 'मेमू'ची सेवा हवी असेल तर त्यांनी आता आक्रमक भूमिका घेणे आवश्यक आहे. केवळ निवेदन देऊन हा प्रश्न सुटणार नाही. विषयाचे गांभीर्य लक्षात येण्यासाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागणार आहे. रेल रोको झाल्यास याची दखल रेल्वे बोर्ड कडून घेण्यात येते. तेव्हा 'मेमू'साठी जनरेटा आवश्यक बनला आहे.

पुणे-दौड दरम्यान मेमू धावावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्नदेखील सुरू आहेत. मुख्यालय काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- डदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply