Pune : पुण्यात ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने; जोरदार राडा, पोलिस घटनास्थळी दाखल

Pune: निवडणुक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे देण्याचा निर्णय काल जाहीर केला होता. या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. अनेकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत ही लोकशाहीची हत्या असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

या निकालानंतर राज्यभरात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहेत. पुण्यातही दोन्ही गटामध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील नवी पेठ भागात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते.

ज्यानंतर दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यामुळे बाळासाहेबांची शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली. महत्वाचे म्हणजे केंद्रिय मंत्री अमित शहा आज पुण्यात आहेत. त्यांच्या दौऱ्यावेळीच हा राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे गट काय भूमिका घेणार याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या निर्णयाविरोधात सुप्रिम कोर्टात जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर मी जराही खचलो नाही, यापुढे अजून जोमाने काम करु अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply