Pune : पुणेकरांना मोठा फटका! PMPML ठेकेदार अचानक संपावर

पुणेकरांचा प्रवास सुखकर करणारी पीएमपीएमएल काही दिवस पुणेकरांचे हाल करण्याची शक्यता आहे. पुणेकरांना पीएमपीएमएल ठेकेदारांच्या संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे. पीएमपीएमएल ठेकेदार आज दुसऱ्या दिवशीही संपावर ठाम आहेत. ओलेक्ट्रा, हंसा, अँथोनी, ट्रॅव्हल टाईम या चार ठेकेदारांनी संप पुकारला आहे. ३ महिन्यांची बिले थकल्यामुळे या ठेकेदारांनी संप पुकारला आहे.

ठेकेदारांच्या संपामुळे फटका पुणेकरांना बसणार आहे. पुण्यातील मोठी सार्वजनिक वाहतूक यामुळे कोलमडण्याची शक्यता आहे. जवळपास 1100 बसेस यामुळे धावणार नसल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप होण्याची शक्यता आहे.

पीएमपीएमलचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी ठेकेदारांना हा संप मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र ठेकेदार आपल्या निर्णयावर ठाम आहेत. ठेकेदारांनी अनेक वेळा पत्र व्यवहार करूनही त्यांना वेळेवर थकबाकी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी संप पुकारला आहे.

काल (रविवारी) संध्याकाळी ठेकेदारांनी अचानक संपाचा निर्णय घेतल्यानंतर रस्त्यावर पीएमपीएमएल बस संख्या अचानक कमी झाली.पीएमपीएमएलकडे सध्या 2142 बसेस आहेत. यापैकी 1100 बसेस या ठेकेदारांच्या असून इतर 900 बसेस या पीएमपीच्या मालकीच्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply