
सिंहगड : खडकवासला धरणाच्या पाण्यात एनडीए-बहुली रस्त्यावरील कुडजे गावच्या हद्दीत एका अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. संबंधित व्यक्तीचे वय अंदाजे तीस ते पस्तीस वर्षे असावे असा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी वर्तवला असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. याबाबत उत्तमनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पीएमआरडीए च्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राला खडकवासला धरणाच्या पाण्यावर कुडजे गावच्या हद्दीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती पुणे शहर अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून मिळाली. पीएमआरडीए चे विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल रोकडे, किशोर काळभोर, श्रीकांत आढाव,
सूरज इंगवले व विशाल घोडे या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू केली. ज्या ठिकाणी मृतदेह तरंगत होता त्या ठिकाणी उतरणे अवघड असल्याने नौदलाच्या बोटीने अग्निशमन दलाचे जवान मृतदेहाजवळ पोहोचले व मृतदेह पाण्याबाहेर काढला.
उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या सूचनेनुसार पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत उत्तमनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून याबाबत पुढील तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी दिली आहे.
मृतदेह वाहत आला असावा....... ज्या ठिकाणी मृतदेह आढळला तेथील भौगोलिक परिस्थिती पाहता तेथे उतरणे शक्य नसल्याने व तेथे संबंधित व्यक्तीचे कपडे किंवा इतर वस्तू दिसून न आल्याने मृतदेह धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील इतर ठिकाणाहून वाहत येऊन येथे खडकाजवळ अडकला असावा असा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी वर्तवला आहे. याबाबत उत्तमनगर पोलीस अधिक तपास करत असून मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी



























Subscribe to my channel


