Pramod Sawant : प्रमोद सावंत यांची पाच वर्षे पूर्ण ; गोव्यात कार्यकाळ पूर्ण करणारे भाजपचे पहिले मुख्यमंत्री

पणजी : डॉ. प्रमोद सावंत हे भाजपचे मुख्यमंत्रिपदाची सलग पाच वर्षे पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही नेत्याच्या शैलीची छाप स्वतःवर पडू न देण्याची काळजी घेत त्यांनी त्यांचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध केले आहे.स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात त्यांना या पाच वर्षांत यश आले आहे. १९ मार्च २०१९ रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. भाजपचे नेते आणि गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही मुख्यमंत्रिपदाची सलग पाच वर्षे पूर्ण करता आली नव्हती. पर्रीकर यांनी चार वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. डॉ. सावंत यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रथम शपथ घेतली तेव्हा गोव्यातील परिस्थिती त्यांच्यासाठी प्रतिकूल होती. मात्र त्यांनी संयम दाखवत प्रतिकूल परिस्थिती हाताळली.

Maharshtra Politics : राजसाहेब पक्षहिताचा निर्णय घेतील, राज ठाकरेंच्या दिल्लीवारीवर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया

सावंत यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रथम शपथ घेतली तेव्हा परिस्थिती सर्वार्थाने प्रतिकूल होती. मनोहर पर्रीकर हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील असे गृहित धरून गोव्यातील राजकीय आखणी करण्यात आली होती.

मात्र त्यांच्या निधनाने निर्माण झालेली राजकीय कोंडी फोडण्यासाठी, सावंत यांनी तत्‍कालीन विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्यासह १० आमदार आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या दोन आमदारांना मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश देत राजकीय कोंडी फोडली. डॉ. सावंत हे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना मंत्री म्हणूनही काम करण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळे त्यांच्याविषयी अनेकांनी साशंकता व्यक्त केली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply