Prakash Shendge : अन्यथा ओबीसी समाजाचाही २६ तारखेला मुंबईत मोर्चा; प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा

Prakash Shendge : मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा जीआर जा अन्यायकारक असून सदरचा जीआर रद्द करा व कुणबी नोंदी रद्द करा. अशी मागणी करत २६ तारखेला ओबीसी मुंबईला मोर्चा काढणार असल्याचा इशारा  प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिला आहे.

धाराशिव येथे माध्यमाशी संवाद साधताना त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. राज्य सरकारने मराठा समाजासाठी काढलेला शासन निर्णय हा ओबीसी समाजावर अन्याय करणारा असून याच जीआराच्या आधारे ५४ लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत. एवढी लोक ओबीसीमध्ये येत असतील तर हा ओबीसीवर अन्याय होत असल्याचं सांगत सदरचा जीआर रद्द करावा. तसेच या कुणबी नोंदी रद्द कराव्यात; या मागणीसाठी मराठा समाजापाठोपाठ ओबीसी समाज ही २६ तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असल्याचा इशारा ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिला आहे.

Prakash Shendge : अन्यथा ओबीसी समाजाचाही २६ तारखेला मुंबईत मोर्चा; प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा

  

ओबीसी बांधव मेंढ्या शेळ्या व इतर जनावरांसह मुंबईत धडकणार असल्याचे देखील प्रकाश अण्णा शेंडगे यांनी सांगितले आहे. या मोर्चामुळे जर काही तणाव निर्माण झाला, तर याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचे देखील शेंडगे यांनी सांगितले आहे. 

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply