Prakash Ambedkar : इंडिया आघाडी शिल्लक राहिली नाही; MVA बैठकीतून बाहेर आल्यानंतर प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज शुक्रवारी महाविकास आघाडीच्या बैठकीला पहिल्यांदा हजेरी लावली. महाविकास आघाडीच्या या बैठकीतून बाहेर आल्यानंतर लोकसभेच्या जागावाटपावर बैठक सकारात्मक झाल्याचे आंबेडकरांनी म्हटलं. तसेच यावेळी इंडिया आघाडी शिल्लक राहिली नाही, असं मोठं वक्तव्यही प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. 

प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. 'लोकसभा जागावाटपावरील चर्चा सकारात्मक झाली. या बैठकीत काही मुद्दे ठेवले होते. त्याबाबत तिन्ही पक्ष एकत्र चर्चा करतील. त्यात आणखी काही भर घालायची आहे. त्यानंतर कच्चा मसुदा तयार करण्यात येईल. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. आता इतर मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होईल. मला बाहेर जायचं असल्याने बैठकीतून चाललो आहे, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं. 

Pandharpur News : अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार...; दुष्काळामुळे मंगळवेढा गावकरी आक्रमक

'आम्ही आता इंडिया आघाडी होऊ नये, याची काळजी घेऊ. ताक जरी असलं तरी फुंकून फुंकून प्यायचं ठरवलं आहे. लोकसभेच्या जागावाटपचा मुद्दा पुढच्या बैठकीत असेल, आजच्या बैठकीमध्ये कॉमन मिनियम प्रोग्रामबद्दल चर्चा झालेली आहे, असे आंबेडकरांनी पुढे सांगितले.

इंडिया आघाडीवर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

इंडिया आघाडीवर भाष्य करताना आंबेडकरांनी सांगितले की, 'इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही. अखिलेश आणि काँग्रेस हे लास्ट पार्टनर राहिले होते, ते माझ्या माहितीप्रमाणे दोघेही वेगळे झालेले आहेत. काँग्रेस वेगळ्या मार्गाने जात आहे. तर शरद पवार गट सुद्धा वेगळ्या मार्गाने जात आहे. त्यामुळे राज्यात अशी परिस्थिती घडू नये यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत'.

'वंचित' महाविकास आघाडीचा भाग नाही : प्रकाश आंबेडकर

वंचित अद्यापही महाविकास आघाडीचा भाग नाही, असेही प्रकाश आंबेडकरांनी यांनी स्पष्ट केले. 'आम्ही केवळ राष्ट्रवादी आणि ठाकरे गटासोबत आहोत. त्यानंतर पुढील आठवड्यात काँग्रेस वरिष्ठ नेते येणार आहेत. त्यानंतर पुढील बोलणी होणार आहे, असेही आंबेडकर म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply